English मराठी

महसूल विभाग

सन २०१८-१९ दुष्काळ घोषित केलेले तालुके तसेच दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित केलेल्या गावांसाठी विविध उपाययोजना आणि सवलती
लाभाचा तपशील
तुम्हाला पुढीलप्रमाणे सवलती मिळतील तसेच उपाययोजना केल्या जातील. १) जमीन महसुलामध्ये सूट मिळेल.लाभाचा तपशील २) तुमच्या सहकारी कर्जाचे पुनर्गठन केले जाईल. ३) तुमच्या शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती दिली जाईल. ४) तुम्हाला कृषी पंपाच्या चालू वीजबिलामध्ये ३३.५% सूट मिळेल. ५) तुम्ही शालेय / महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यास तुम्हाला परीक्षा शुल्कात माफी मिळेल. ६) जिथे जिथे पिण्याच्या पाण्याची कमतरता असेल अशा आवश्यक त्या सर्व ठिकाणी टँकरद्वारे पाणी पोहोचविले जाईल. ७) तुम्ही टंचाई जाहीर झालेल्या गावातील शेतकरी असाल तर तुमच्या शेती पंपाची वीज जोडणी बंद केली जाणार नाही
ऑनलाईन अर्जासाठी लिंक
उपलब्ध नाही
आवश्यक कागदपत्रे
त्या त्या सवलती आणि उपाययोजनांसाठी शासकीय अधिकारी यांनी वेळोवेळी निर्देश दिल्याप्रमाणे

कृषी विभाग

केळी पीकावरील करपा (सिगाटोका) रोग नियंत्रण कार्यक्रम
लाभाचा तपशील
१)केळी पीकावर करपा रोग पडत असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तालुकास्तरावरून अनुदानित रकमेत कीटकनाशके आणि बुरशीनाशके मिळू शकतील. २) जिल्हानिहाय जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत केळी या पीका संदर्भात तुमच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, शेतीशाळा आयोजित केल्या जातील.

ऑनलाईन अर्जासाठी लिंक
उपलब्ध नाही
आवश्यक कागदपत्रे
 • ७/१२ उतारा
 • नमुना ८ अ

 • कृषी विभाग

  पीकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप)
  लाभाचा तपशील
  १) सोयाबीन, कापूस, भात,मका, ऊस, ज्वारी , तूर व हरभरा पिकांवरील कीड/रोगांच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना एस.एम.एस.द्वारे शास्त्रोक्त व मोफत सल्ला देण्यात येतो. २) आपत्कालीन परिस्थितीत जिल्ह्यास उपलब्ध कार्यक्रमानुसार ५० टक्के अनुदानावर (रु.७५०/- प्रति हेक्टर मर्यादेत) किटकनाशकांचा पुरवठा करण्यात येतो. ३) कीड रोग व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण तसेच या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या गाव बैठकातून मार्गदर्शन मिळते. ४) आंबा, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी व चिक्कू या पीकांना किडीपासून वाचविण्यासाठी फायदा होऊ शकेल. जसे की, कीड नियंत्रणासाठी काय करावे याचे माहिती तंत्रज्ञान हे प्रशिक्षणाद्वारे मिळेल ५) वेळ प्रसंगी ५० % अनुदानावर तालुकास्तरावरून औषधे उपलब्ध करून दिली जातील.

  ऑनलाईन अर्जासाठी लिंक
  उपलब्ध नाही
  आवश्यक कागदपत्रे
 • ७/१२ उतारा
 • नमुना ८ अ

 • कृषी विभाग

  गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
  लाभाचा तपशील
  शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास निर्माण होणाऱ्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण मिळते. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एक सदस्य याचा लाभ घेऊ शकतो. (1) अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 अवयव निकामी झाल्यास रु. 2 लाख विमा संरक्षण. (2) अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 अवयव निकामी झाल्यास रु. 1 लाखाचे विमा संरक्षण.

  ऑनलाईन अर्जासाठी लिंक
  उपलब्ध नाही
  आवश्यक कागदपत्रे
 • ७/१२ उतारा
 • वयाचा दाखला
 • प्रथम माहिती अहवाल
 • मृत्यू दाखला
 • घटनास्थळ पंचनामा
 • विजेचा धक्का अपघात, वीज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचीवरून पडून झालेला मृत्यू, सर्पदंश/ विंचूदंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल

 • कृषी विभाग

  प्रधानमंत्री फसल विमा योजना
  लाभाचा तपशील
  १) वार्षिक-व्यापारी-बागायती पीकांसाठी ५%, खरीप पीकांसाठी २% तर रबी पीकांसाठी १.५% एवढ्या स्वस्त प्रीमियम मध्ये तुमच्या पीकांना विमा संरक्षण मिळेल. यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार कडून तुमच्या विम्याच्या प्रीमियमचा बराचसा भाग सरकार भरणार आहे. २) शेतकऱ्यांना संरक्षणासाठी घेतलेली पूर्ण रक्कम कोणत्याही कपातीशिवाय मिळणार आहे. ३) सबसिडीवर मर्यादा नाही. यामध्ये काढणीपश्चात व संरक्षित पेरणीतील नुकसानीला संरक्षित करण्यात आले आहे.

  ऑनलाईन अर्जासाठी लिंक
  उपलब्ध नाही
  आवश्यक कागदपत्रे
 • ७/१२ उतारा
 • बँकेचे पासबुक

 • महसूल विभाग

  'अंगावर वीज पडणे' या राज्याच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत पावलेल्या अथवा अपंग झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत
  लाभाचा तपशील
  १) अंगावर वीज पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना ४ लाख रुपये आर्थिक मदत मिळेल. २) जर वीज पडून ४० ते ६० % अपंगत्व आले तर ५९,१००/- आणि ६०% पेक्षा जास्त अपंगत्व आले तर २ लाख रुपये आर्थिक मदत मिळेल. तसेच एका आठवड्याहून जास्त काळ दवाखान्यात दाखल झाल्यास १२,७००/- आणि त्यापेक्षा कमी कालावधीसाठी ४,३००/- इतकी मदत मिळेल.

  ऑनलाईन अर्जासाठी लिंक
  उपलब्ध नाही
  आवश्यक कागदपत्रे
  मृत व्यक्तीच्या वारसांसाठी:
 • मृत व्यक्तीचे कारण प्रमाणित करणारा वैद्यकीय दाखला
 • वारस असल्याच्या पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे
 • बँक पासबुक
 • अपंग व्यक्तींसाठी
 • अपंगत्वाचे प्रमाणपत्र
 • बँक पासबुक

 • महिला व बालविकास विभाग

  मनोधैर्य योजना
  लाभाचा तपशील
  अ) पीडीतास मंजूर करण्यात आलेल्या एकूण रक्कमेपैकी सुरुवातीस तातडीची मदत म्हणून मंजूर करण्यात आलेली रु.30 हजार इतकी रक्कम वजा करुन उर्वरित 25% रक्कम पिडीतास अथवा पिडीताच्या नातेवाईकास रोखीने अदा करण्यात येईल. त्यानंतर उर्वरित 75% रक्कम पिडीताच्या नावे पिडीत किंवा त्याच्या अल्पवयीन वारसाच्या नावे १० वर्षासाठी (पिडीत बालक असेल तर वयाच्या १८ वर्षापर्यंत) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत बँकेत मुदतठेव म्हणून ठेवण्यात येईल
  १) बलात्कार विषयक घटनांमध्ये:
 • बलात्काराच्या घटनेच्या परिणाम स्वरूप मानसिक धक्का बसून महिलेस कायमचे मतिमंदत्व/ अपंगत्व आल्यास अथवा सामूहिक बलात्कार प्रकरणी महिलेस गंभीर व तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा झाल्यास- - रु. १० लाख पर्यंत
 • भूलथापा, फसवणूक, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार झाला असेल तर – रु. १ लाख पर्यंत
 • कौटुंबिक हिंसाचार अधिनियम- २००५ नुसार न्यायालयात/ फारकत / घटस्फोट झाल्यानंतर पतीकडून महिलेच्या बाबतीत बलात्काराची घटना घडल्यास- रु. १ लाखापर्यंत
 • बलात्काराच्या घटनेमुळे महिलेचा मृत्यू झाल्यास ती महिला कमावत्या कुटुंबातील नसल्यास रु. १ लाखापर्यंत आणि असल्यास रु. २ लाखापर्यंत.
 • २) पॉक्सो अंतर्गत बालकांवर लैंगिक अत्याचार विषयक घटनांमध्ये:
  • घटनेमध्ये पीडित बालकास / अल्पवयीन मुलीस मानसिक धक्का बसून कायमचे मतिमंदत्व/ अपंगत्व आल्यास अथवा गंभीर व तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा झाल्यास- - रु. १० लाख पर्यंत
  • भूलथापा, फसवणूक, लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात – रु. १ लाख पर्यंत.
  ३) ॲसिड हल्ला:
  • घटनेमध्ये पीडित महिला / बालकाचा चेहरा विद्रूप झाल्यास, शरीराच्या दृश्य भागाची हानी झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास- रु. १० लाखापर्यंत
  • ॲसिड हल्ल्यात जखमी झाल्यास- रु. ३ लाखापर्यंत

  ब) बलात्काराच्या घटनेमुळे गंभीर इजा / आजार अथवा HIV लागण झाली असेल तर त्यासाठी संबंधितास शासकीय रुग्णालयातून मोफत उपचार दिले जातील.
  क) ॲसिड हल्ल्यात चेहरा विद्रूप झाल्यास करावयाच्या प्लास्टिक सर्जरी शासनाने निश्चित केलेल्या रुग्णालयात शासनाच्या खर्चाने होईल.
  ड) याशिवाय सदर पिडीत महिलेस वैद्यकीय आधार देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या प्रशिक्षित टीम मार्फत समुपदेशन / कायदेशीर इ. सेवा विनामूल्य पुरवण्यात येतील.
  इ) तसेच सदर पिडीत महिलेस नोकरी / व्यावसायिक प्रशिक्षण देवून तिचे पुनर्वसन करण्यात येईल.

  ऑनलाईन अर्जासाठी लिंक
  उपलब्ध नाही
  आवश्यक कागदपत्रे
 • प्रथम माहिती अहवाल (FIR)
 • अधिकृत शासकीय, निमशासकीय संस्थांमधील वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला प्राथमिक वैद्यकीय अहवाल
 • मा. न्यायधीशांसमोर CRPC 164 अन्वये पिडीताने दिलेला जबाब

 • वन विभाग

  वन्यप्राण्यांपासून मनुष्य हानी, पशुधन हानी, शेतपीकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्यास संबंधितांस नुकसार भरपाई देण्याबाबत
  लाभाचा तपशील
  वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येईल

  ऑनलाईन अर्जासाठी लिंक
  http://www.mahaforest.nic.in/
  आवश्यक कागदपत्रे
 • पीक नुकसान झालेल्या क्षेत्राचा पंचनामा, मोजणी व नुकसानीबाबतच्या पुराव्याची कागदपत्रे

 • वित्त विभाग

  राज्य शासकीय / निमशासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना
  लाभाचा तपशील
  फक्त ३५४ रूपयांच्या वार्षिक वर्गणीमध्ये तुम्हाला १० लाख रुपयांचे अपघाती विम्याचे संरक्षण मिळेल

  ऑनलाईन अर्जासाठी लिंक
  उपलब्ध नाही
  आवश्यक कागदपत्रे
 • शासनमान्य ओळखपत्र
 • अपघाती मृत्यू झाल्यास / शारीरिक अपंगत्व आल्यास विमा कंपनीने निर्देशित केल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे

 • विधी व न्याय विभाग

  धर्मादाय रुग्णालयात / वैद्यकीय केंद्रात निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार देणेबाबत योजना.
  लाभाचा तपशील
  गरीब रुग्णांना मोफत तर दूर्बल घटकातील रुग्णांना सवलतीच्या दरात धर्मादाय रुग्णालयात वैद्यकीय उपचार मिळतील.

  ऑनलाईन अर्जासाठी लिंक
  उपलब्ध नाही
  आवश्यक कागदपत्रे
 • शिधापत्रिका
 • तहसीलदार यांचेकडील उत्पन्नाचे प्रमाणपत्र

 • सार्वजनिक आरोग्य विभाग

  महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना
  लाभाचा तपशील
  १. दारिद्रयरेषेखालील किंवा केशरी शिधापत्रिका धारक असावा. २. सर्व स्त्रोतातून मिळणारे वार्षिक उत्पन्न हे १ लाखाच्या आत असावे. ३. शासकीय अथवा निमशासकीय सेवेतील कर्मचारी नसावा. ४. आयकर दाता नसावा. किंवा ५. पांढरी शिधापत्रिका असल्यास लाभार्थी शेतकरी असावा आणि त्याचा जिल्हा पुढीलपैकी एक असावा. अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, वर्धा

  ऑनलाईन अर्जासाठी लिंक
  https://www.jeevandayee.gov.in
  आवश्यक कागदपत्रे
 • शिधापत्रिका
 • शासकीय ओळखपत्र
 • शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांसाठी ७ / १२ चा उतारा

 • शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

  राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
  लाभाचा तपशील
  खालीलप्रमाणे सानुग्रह अनुदान मिळेल. १) अपघाती मृत्यू झाल्यास रु. ७५ हजार २) अपघातामुळे कायमचे अपंगत्व (२ अवयव / २ डोळे किंवा 1 अवयव / १ डोळा निकामी )झाल्यास रु. ५० हजार ३) अपघातामुळे कायमचे अपंगत्व (१ अवयव किंवा १ डोळा कायम निकामी )झाल्यास रु. ५० हजार

  ऑनलाईन अर्जासाठी लिंक
  उपलब्ध नाही
  आवश्यक कागदपत्रे
  अपघाती मृत्यू झाला असेल तर
 • प्रथम खबरी अहवाल (FIR)
 • स्थळ पंचनामा
 • इंक्वेस्ट पंचनामा
 • सिव्हील सर्जन यांनी प्रती स्वाक्षरीत केलेले मयत विद्यार्थ्याच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल
 • मृत्यू दाखला (सिव्हील सर्जन यांनी प्रति स्वाक्षरीत केलेले)

 • अपंगत्व आल्यास
  अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र सिव्हील सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र)

  कृषी विभाग

  राकृवियो अंतर्गत १००% अनुदानावर वैरण बियाणे व खते वितरण
  लाभाचा तपशील
  तुम्हाला वैरण बियाणे आणि आणि खतांसाठी प्रती गुंठे ४६० रुपये या प्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त १ हेक्टर साठी ४,६०० रुपये च्या मर्यादेत १००% अनुदान मिळेल.

  ऑनलाईन अर्जासाठी लिंक
  उपलब्ध नाही
  आवश्यक कागदपत्रे
 • ७/१२ उतारा
 • नमुना ८ अ