English मराठी
 • योजनेचे नाव: सन २०१८-१९ दुष्काळ घोषित केलेले तालुके तसेच दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित केलेल्या गावांसाठी विविध उपाययोजना आणि सवलती
योजनेचा उद्देश
दुष्काळसदृश्य परिस्थिती असणाऱ्या प्रभावित तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना आणि सवलती देऊन दुष्काळ निवारणाचा प्रयत्न करणे.
पात्रतेचा तपशील
लाभार्थी हा दुष्काळ घोषित झालेल्या तालुक्यांतील अथवा दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित केलेल्या १७ जिल्ह्यातील ४५१८ गावांपैकी असावा.
लाभाचा तपशील
तुम्हाला खालीलप्रमाणे सवलती मिळतील तसेच उपाययोजना केल्या जातील.
 • जमीन महसुलामध्ये सूट मिळेल.
 • तुमच्या सहकारी कर्जाचे पुनर्गठन केले जाईल.
 • तुमच्या शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती दिली जाईल.
 • तुम्हाला कृषी पंपाच्या चालू वीजबिलामध्ये ३३.५% सूट मिळेल.
 • तुम्ही शालेय / महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यास तुम्हाला परीक्षा शुल्कात माफी मिळेल.
 • जिथे जिथे पिण्याच्या पाण्याची कमतरता असेल अशा आवश्यक त्या सर्व ठिकाणी टँकरद्वारे पाणी पोहोचविले जाईल.
 • तुम्ही टंचाई जाहीर झालेल्या गावातील शेतकरी असाल तर तुमच्या शेती पंपाची वीज जोडणी बंद केली जाणार नाही.
 • आवश्यक कागदपत्रे
  त्या त्या सवलती आणि उपाययोजनांसाठी शासकीय अधिकारी यांनी वेळोवेळी निर्देश दिल्याप्रमाणे
  संपर्क
  आपल्या गावाचे ग्रामसेवक अथवा तलाठी
  ऑनलाईन अर्जासाठी लिंक
  उपलब्ध नाही