English मराठी
 • योजनेचे नाव: धर्मादाय रुग्णालयात / वैद्यकीय केंद्रात निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार देणेबाबत योजना.
योजनेचा उद्देश
गरीब रुग्णांना मोफत व दुर्बल घटकातील रुग्णांना सवलतीच्या दराने धर्मादाय रुग्णालयात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे.
पात्रतेचा तपशील
 • सर्व स्त्रोतातून मिळणारे वार्षिक उत्पन्न हे १ लाखाच्या आत असावे.
 • रुग्ण गरीब घरातील अथवा दुर्बल घटकातील असावा.
लाभाचा तपशील
गरीब रुग्णांना मोफत तर दुर्बल घटकातील रुग्णांना सवलतीच्या दरात धर्मादाय रुग्णालयात वैद्यकीय उपचार मिळतील.
आवश्यक कागदपत्रे
 • शिधापत्रिका
 • तहसीलदार यांचेकडील उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • संपर्क
  संबंधित जिल्ह्यातील संबंधित धर्मादाय रुग्णालय अथवा वैद्यकीय केंद्र
  ऑनलाईन अर्जाकरिता लिंक
  उपलब्ध नाही